जुन्नर युवा मतदारांच्या प्रतिक्रिया

जुन्नर युवा मतदारांच्या प्रतिक्रिया

प्रतिक्रिया : स्थानिक १) युवा मतदारांच्या अपेक्षा २) जेष्ठ नागरिक काय म्हणतात

लोकसभेत अभ्यासू व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असणारा व ते प्रश्न तत्परतेने सोडविणारा उमेदवार निवडून द्यावा. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविल्या पाहिजेत तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले अमूल्य मत देऊन भारतीय लोकशाही बळकट करावी.
- रोहित चव्हाण, टीवायबीए मानसशास्त्र, श्री शिवछत्रपती कॉलेज जुन्नर
---------------------------------------------
महिला, युवक व शेतकरी वर्गाच्या समस्या समर्थपणे संसदेत मांडून त्या योग्य रीतीने सोडविण्यासाठी व तळागाळातील लोकांच्या प्रश्नांची जाणीव असणारा खासदार लोकसभेत पाठवावा. मतदानाचा हक्क बजावताना कुठल्याही आमिषास बळी न पडता सक्षम व कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी निवडून दिल्यास लोकशाही नक्की सुदृढ होईल.
- संतोषी कामटकर एफवायबीए, श्री शिव छत्रपती कॉलेज, जुन्नर
---------------------------------------------
ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. यासाठी ज्येष्ठांच्या प्रश्नांची जाण असणारा लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे. ज्येष्ठांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्रे उभारून तेथे करमणुकीची साधने उपलब्ध करून द्यावीत. शासकीय कार्यालयांमध्ये ज्येष्ठांच्या समस्यांसाठी प्राधान्य दिले जावे. ज्येष्ठांच्या गरजा जाणणारा लोकप्रतिनिधी असावा.
- रत्नाकर आवटे, माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, जुन्नर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com