जुन्नर शहरातील सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरणचे प्रयत्न

जुन्नर शहरातील सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरणचे प्रयत्न

जुन्नर, ता. ११ : येत्या पावसाळ्यात जुन्नर शहरात वीज पुरवठा खंडित होणार नाही, यासाठी महावितरणकडून विविध उपाय योजना करण्यात येत असून ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत राहण्याची काळजी घेण्यात येणार असल्याचे महावितरणचे जुन्नर शहर कनिष्ठ अभियंता शंकर चौधरी यांनी सांगितले.
यात्रा व निवडणूक यामुळे पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे नियोजन येत्या १६ मे पासून करण्यात येणार आहे. शहरातील वीज तर, विजेचे खांब यांची सद्य:स्थिती पाहून त्यानुसार कामकाज हाती घेण्यात येणार आहे. जुन्नर शहरात सुमारे अकरा किलोमीटर लांबीच्या वीज वाहक तारा असून यासाठी दोनशेहून अधिक खांब आहेत. ज्या ठिकाणी वीजवाहक तारा लोंबकळत आहेत त्या ओढून घेण्यात येणार आहे. पावसाळ्यात जोराच्या वादळामुळे वीजवाहक तारा तुटून खाली पडण्याचा धोका असतो. यासाठी आवश्यक तेथे तारांना गार्डनिंग करण्यात येणार आहे तसेच फ्यूज बसविण्यात येणार आहेत. पावसाळ्यात कमीत कमी वेळ वीज जाईल याची दक्षता घेण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com