जुन्नर येथून मतदान कर्मचारी रवाना

जुन्नर येथून मतदान कर्मचारी रवाना

जुन्नर, ता. १२ : शिरूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकींतर्गत जुन्नर विधानसभा मतदारसंघात सोमवारी (ता. १३) होणाऱ्या मतदानासाठी केंद्रावर साहित्यासह कर्मचारी रविवारी (ता. १२) रवाना झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाडगे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र सबनीस यांनी दिली.
येथील शंकरराव बुटे पाटील विद्यालयाच्या प्रांगणात मतदान साहित्य वितरण व स्वीकृतीची व्यवस्था करण्यात आली होती. जुन्नरमधील ३५६ मतदान केंद्रावर ५४ एसटी बस आणि २७ जीपमधून मतदान कर्मचारी साहित्य पाठविण्यात आले आहे. दुर्गम भागातील मतदान केंद्रासाठी जीपचा वापर करण्यात येणार आहे.
जुन्नर विधानसभा मतदार संघात वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ११२ आदर्श मतदान केंद्र असणार आहे. जुन्नर येथील नगर परिषद शाळा क्रमांक एक येथील मतदान केंद्र क्रमांक १५५ येथे महिला मतदान केंद्र तर १५७ हे केंद्र युनिक मतदान केंद्र राहणार आहे. जुन्नर मधील अंजुमन हायस्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक १७० दिव्यांग मतदान केंद्र आहे. आळे येथील ज्ञानमंदिर हायस्कूल मधील मतदान केंद्र क्रमांक २०२ मध्ये युवा मतदान केंद्र करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com