मतदान केंद्र परिसरात सर्रास मोबाईलचा वापर

मतदान केंद्र परिसरात सर्रास मोबाईलचा वापर

जुन्नर, ता. १३ : मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल व वाहन नेण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली असली तरी प्रत्यक्षात मात्र ही बाब फारशी गांभीर्याने घेतली गेली नसल्याचे दिसून आले. अनेक मतदान केंद्रात मतदार सर्रास मोबाईल घेऊन जात होते. काहींनी तर व्हीव्हीपॅटमधील स्लीपचा देखील फोटो काढला. मतदारांकडे मोबाईल आहे किंवा नाही याची कोणी खातरजमा करत नसल्याने अनेकांनी आपले फोटो काढून घेतले. जुन्नर शहरातील एक सेल्फी पॉइंट तर शंभर मीटरच्या आतच होता. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी मोबाईलवर फोटो काढण्यास मज्जाव करण्यात येत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com