जुन्नरला पीक विमा योजनेसाठी पाच हजार शेतकऱ्यांची नोंदणी

जुन्नरला पीक विमा योजनेसाठी पाच हजार शेतकऱ्यांची नोंदणी

Published on

जुन्नर, ता.२ : ‘‘खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील मंगळवारी (ता.२) अखेर ५ हजार २५ शेतकऱ्यांनी प्रति अर्ज रक्कम एक रुपया भरून पोर्टलवर नोंदणी केली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी १५ जुलै ही अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनी पीकविमा काढून सुरक्षा कवच मिळवावे,’’ असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी केले आहे.
खरिपातील पिकासाठी ही विमा योजना असून, नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते. आपले सरकार सेवा केंद्र सीएससी धारकांस विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज ४० रुपये देत असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. बिगर कर्जदार शेतकरी आपल्या पिकांचा विमा जवळच्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, प्राथमिक कृषी सहकारी सोसायटी आदी वित्तीय संस्थेमार्फत घेऊ शकतात. प्रादेशिक ग्रामीण बँका, आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी)/ https://pmfby.gov.in/farmerLogin वेबसाइट लिंकद्वारे स्वतःच्या पीक विमा नोंदणी करू शकतात. योजनेसंबंधित अधिक माहितीसाठी, कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन (KRPH) क्रमांक : ९१४४४७ वर उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.