नर्सरीसह कीटकनाशक विक्री केंद्रावर कारवाई

नर्सरीसह कीटकनाशक विक्री केंद्रावर कारवाई

Published on

जुन्नर, ता. २ : जुन्नर तालुक्यातील आणखी तीन विक्रेत्यावर कृषी विभागाने परवाना निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण निरीक्षक नीलेश बुधवंत यांनी दिली.
आता भोरवाडी (हिवरे बुद्रुक) व निरगुडे येथील शेतकऱ्यांची निकृष्ट दर्जाचे बियाणे व रोपांविषयी तक्रार प्राप्त झाल्याने नारायणगाव येथील साईबाबा हायटेक नर्सरी व निरगुडे (बेजवाट फाटा) येथील जय हनुमान ॲग्रो सर्विसेस यांच्या विक्री केंद्राची तपासणी बुधवंत यांनी केली होती. यात ग्राहकांना पावत्या न देणे, साठा व भाव फलक प्रदर्शित न करणे आदी गंभीर बाबी तपासणी दरम्यान आढळून आल्या होत्या. संबंधिताने नोटीसला उत्तर न दिल्याने संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली.
तालुक्यातील खोडद येथील कृषिधन हायटेक या कीटकनाशक विक्री केंद्राची तपासणी केली होती. संबंधितास लेखी खुलासा सादर करण्याबाबत कळविले होते मात्र वेळेत खुलासा सादर न केल्याने सदर कीटकनाशक विक्री केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला असल्याचे बुधवंत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.