कुमशेतला मोफत बालआरोग्य चिकित्सा शिबिर

कुमशेतला मोफत बालआरोग्य चिकित्सा शिबिर

Published on

जुन्नर, ता. ७ : कुमशेत (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत मोफत बालआरोग्य चिकित्सा शिबीराचे आयोजन केले होते. जुन्नर येथील चाइल्ड केअर फाउंडेशनच्यावतीने स्व. वास्तू विशारद चैतन्य डुंबरे यांच्या स्मरणार्थ तसेच आठवड्यातील डॉक्टर दिनाचे निमित्ताने डॉक्टर आपल्या भेटीला उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बालरोगतज्ञ डॉ.सचिन डुंबरे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता, सकस पौष्टिक आहार, चांगल्या सवयी, खेळाचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले. लायन्स क्लब शिवनेरी जुन्नरचे माजी अध्यक्ष भास्कर डुंबरे, चाइल्ड केअर फाउंडेशन सदस्य धनंजय डुंबरे, साधना डुंबरे, रेवा डुंबरे, ग्रीष्मा डुंबरे, सरपंच रवींद्र डोके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असलम इनामदार, सदस्य चेतन भगत, गणेश डोके, अंगणवाडी ताई सुलोचना डोके, संजीवनी नाईकवाडी, वैशाली डोके, यशवंत घोडे, श्याम लोलापोड आदी यावेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.