उत्पादन वाढीमुळे चारसुत्री भात लागवडीकडे कल
जुन्नर, ता.२७ : पारंपरिक पद्धतीने भात लागवड करून म्हणावे असे उत्पादन मिळत नसल्याने जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांचा उत्पादन वाढ देणाऱ्या चारसुत्री पद्धतीचा अवलंब करण्याकडे कल वाढला आहे. तालुक्यात मागील वर्षी ८०० हेक्टर क्षेत्रावर चारसुत्री भात लागवड केली होती. यावर्षी दोन हजार हेक्टरने वाढ होऊन २ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर चारसुत्री पद्धतीने भात लागवड केली आहे. यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.
पश्चिम आदिवासी भागातील राजूर, खामगाव, उच्छिल, माणिकडोह वानेवाडी, धालेवाडी इंगळूण, सोनावळे, खडकुंबे, उसरान, उंडेखडक, केवाडी आदी गावातून चार सूत्री भात लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी चारसूत्री भात लागवडीवर अधिक भर दिला असल्याचे उच्छील येथील भात उत्पादक शेतकरी जयराम नवले यांनी सांगितले.
कृषी सहायकांनी गावागावात जाऊन चारसूत्री भात लागवड पद्धतीचे महत्त्व पटवून दिले व जनजागृती केली. यामुळे चारसूत्रीच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. या पद्धतीत लागवडीसाठी कमी रोप लागते तसेच खर्चही देखील कमी येतो. मजूरवर्ग कमी लागतो आणि उत्पादन अधिक मिळते. कृषी सहायकांच्या मदतीने या पद्धतीने लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जात आहे. यामुळे क्षेत्रात वाढ झाली असल्याचे कृषी पर्यवेक्षक भारती मडके यांनी सांगितले.
चारसूत्री लागवड करताना स्वतः कृषी विभागाचे अधिकारी शेतावर असतात त्याचाही लाभ होतो असे तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सांगितले.
चारसुत्री पद्धतीमुळे पीक स्पर्धेत यश
मागील वर्षी कृषी विभागाच्या भात पीक स्पर्धेत जिल्हा पातळीवर आदिवासी गटातून निमगिरी येथील प्रशांत शेळके यांचा द्वितीय व जालिंदर साबळे यांचा तृतीय क्रमांक आला होता.
तालुका पातळीवर पांडुरंग रेंगडे, खामगाव-गोद्रे, कोंडिभाऊ बांबळे, माणकेश्वर व धोंडाबाई पोटे, उच्छिल यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले होते. ह्या सर्वांनी चारसूत्री पद्धतीने लागवड केली होती.
07359
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

