‘वडज उपसा सिंचन’साठी विजयादशमीला जलसमाधी
जुन्नर, ता. ९ : मीना खोऱ्यातील वडज उपसा सिंचन योजनेच्या कामाची निविदा विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी काढण्यात यावी. या मागणीसाठी विजयादशमीला जुन्नर तालुक्यातील शेतकरी संघटनांच्या वतीने जलसमाधी आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
आंदोलनात जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी तसेच मीना खोरे संघर्ष समिती, कुलस्वामी उपसा सिंचन समिती, आजाद समाज पक्षाचे प्रतिनिधी तसेच शंभर महिला सहभागी होणार आहेत. वडज उपसा सिंचन योजनेसाठी राज्य सरकारने ३५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून या प्रकल्पाला मान्यता दिल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात काम सुरू न झाल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. पुन्हा पाच वर्ष असेच चालू राहील आणि वर्षानुवर्षं हा प्रश्न तसाच राहतो की काय अशी येथील शेतकऱ्यांची भावना झाली आहे.
योजनेमुळे सावरगाव, खिलारवाडी, निमदरी,धोंडकरवाडी, एकनाथवाडी, काचळवाडी,पाबळवाडी यांसह इतर वाड्या वस्त्यांना याचा लाभ होणार आहे तसेच पिंपळगाव, आर्वी, गुंजाळवाडीच्या दक्षिणेकडील जिरायती भागास कालव्याचा लाभ व्हावा म्हणून सर्वेची मागणी आहे. याप्रश्नासाठी यापूर्वी अनेकदा आंदोलन करण्यात आली.
याबाबत डिंभे धरण विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी सर्व संघटनांना पत्र पाठवून जलसमाधी आंदोलनापासून परावृत्त व्हावे, अशी विनंती केली आहे. या पत्रात योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून सदर योजनेचे प्रकल्प चित्र प्रदेश कार्यालयास सादर करण्यात आले आहे. वडज उपसा सिंचन प्रकल्पाची पुढील कार्यवाही केली असून, योजनेचे प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रक करण्यासाठी उपसा सिंचन परिगणकास उपसमितीची मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव मंडळ कार्यालयामार्फत सादर करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

