लेण्याद्री येथून मतदान कर्मचारी रवाना
जुन्नर, ता. १९ : जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार (ता. २०) रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह कर्मचारी मंगळवारी (ता. १९) रवाना झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाडगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील शेळके यांनी दिली.
श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या यात्री निवास क्रमांक दोनच्या सभागृहात साहित्य वितरण व स्वीकृतीची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभा मतदार संघातील ३५६ मतदान केंद्रावर ५४ एसटी बसेस आणि ३६ जीपमधून मतदान कर्मचारी व साहित्य पाठविण्यात आले आहे. दुर्गम भागातील मतदान केंद्रासाठी जीपचा वापर करण्यात आला आहे.
मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी एकूण ३५६ मतदान केंद्रांसाठी ३६ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मतदान केंद्रांवरील साहित्य वाटपासाठी एकूण ३६ टेबल लावण्यात आले होते. मतदान साहित्य स्वीकृतीसाठी ३८ टेबल ठेवण्यात आले आहेत. एकूण १६५० कर्मचारी, २४२ राखीव कर्मचारी, ४५७ शिपाई कर्मचारी, ३५६ पोलिस शिपाई यांची मतदान प्रक्रियेसाठी नेमणूक केली आहे.
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जुन्नर शहरातील मतदान केंद्र क्रमांक १५९ हे पिंक महिला मतदान केंद्र, तर १७० हे दिव्यांग मतदान केंद्र राहणार असल्याचे मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी सांगितले. आळे येथील मतदान केंद्र क्रमांक २०६ हे युथ मतदान केंद्र, पारगाव तर्फे आळे येथील ३५४ युनिक मतदान केंद्र, सावरगाव येथील ३१५ मॉडेल मतदान केंद्र, तर मतदान केंद्र १६० ते १७२ पर्दाशीन मतदान केंद्र असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

