Shivneri Fort
Shivneri FortSakal

हिंदवी स्वराज्य महोत्सवात नवीन उपक्रमांची मागणी

जुन्नर येथील किल्ले शिवनेरी आणि शिवजन्मभूमी परिसरामध्ये १९ फेब्रुवारी २०२५ रोजी हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन होत आहे.
Published on

जुन्नर - येथील किल्ले शिवनेरी आणि शिवजन्मभूमी परिसरामध्ये १९ फेब्रुवारी २०२५ रोजी हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन होत आहे. मागील दोन वर्षांपासून राज्य शासनाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.

या आयोजनामध्ये विविध संकल्पना या अगोदर राबवल्या गेलेल्या आहेतच, यंदा तिसऱ्या पर्वामध्ये मागील दोन वर्षाव्यतिरिक्त अजूनही काही उपक्रम राबवले जावेत आणि ते स्थानिकांशी निगडित असावेत, अशी मागणी जुन्नर टुरिझम डी. एम. फाउंडेशनने केली आहे.

या तीन दिवसीय उपक्रमामध्ये साहसी खेळ, ऐतिहासिक स्वारी, अनुभवात्मक पर्यटन, इतिहास संशोधन व प्रदर्शन, माझा शिवनेरी लघुपट, शिवज्योत अभिवादन पथ, दुर्गोत्सव, शिवसकाळ, उत्सव मिरवणूक, संचलन आणि शिवव्याख्याते, तसेच नृत्य, संगीत, वैयक्तिक सादरीकरण, शिवजन्मभूमी सायक्लोथॉन, शिवनेरी मॅरेथॉन, कुस्ती आखाडा आणि विशेष म्हणजे येथील खाद्य संस्कृती, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन केले जावे, अशी संकल्पना जुन्नर टुरिझम डी. एम. फाउंडेशनच्या संचालकांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com