अजित पवार-संदीप क्षीरसागरांच्या भेटीची चर्चा
जुन्नर, ता. १६ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी रविवारी (ता. १६) जुन्नर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दालनात भेट घेतल्याने राजकीय चर्चा रंगल्या.
भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘‘मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना? विरोधी पक्षात असताना आम्हीदेखील पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटत होतो. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. क्षीरसागर विरोधी पक्षाचे आमदार असले, तरी त्यांच्या शहरात पिण्यासाठी २१ दिवस पाणी येत नाही. यातून काहीतरी मार्ग काढा, हे सांगण्यासाठी ते आले होते. एवढ्या मोठ्या शहराची पाणीप्रश्नाची तातडीची गरज म्हणून क्षीरसागर येथे आले. याबाबत मी फोन करून मार्ग काढायचा प्रयत्न चालला आहे.’’
संदीप क्षीरसागर म्हणाले, ‘‘बीड नगर पालिकेचा विषय फार गंभीर आहे. यापूर्वी अधिवेशनामध्ये आम्ही विषय मांडलेला आहे. यासंदर्भात मी अजितदादांना भेटायला आलो. पाणी मुबलक असतानाही बीड शहराला १५ ते २०दिवस पाणी येत नाही. तीच अडचण मी त्यांना सांगितली व मार्ग काढण्यास सांगितले.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

