विघ्नहरच्या निवडणुकीत ४ उमेदवारांचे अर्ज अवैध

विघ्नहरच्या निवडणुकीत ४ उमेदवारांचे अर्ज अवैध
Published on

जुन्नर, ता.१८ : ‘‘श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या छाननीत ६२ उमेदवारांचे अर्ज वैध व चार उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत,’’ अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.
उमेदवारी अर्जांची छाननी सोमवारी (ता.१७) झाली. वैध उमेदवारांची यादी मंगळवारी (ता.१८) प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारी अर्ज माघारीसाठी ४ मार्च पर्यंत मुदत आहे. आज पहिल्या दिवशी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने संचालकांच्या २१ जागांसाठी निवडणूक रिंगणात ६० उमेदवार राहिले आहेत. महिला गटातून संगीता घोडके व घोडेगाव गटातून दत्तात्रेय निघोट यांनी माघार घेतली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी उत्पादक सभासद प्रतिनिधी जुन्नर गट व अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून दाखल केलेले अर्ज थकीत कर्जाच्या कारणावरून अवैध झाले. उत्पादक सभासद प्रतिनिधी शिरोली गटातील जालिंदर ढोमसे व पिंपळवंडी गटातील माणिक हांडे यांचे अर्ज सलग तीन वर्षे ऊस नसल्याचे कारणावरून अवैध ठरले आहेत.
अर्ज माघारीची मंगळवार (ता.१८) ते ४ मार्चपर्यंत मुदत असून बुधवारी (ता.५) निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. मतदान शनिवारी (ता.१५) सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत असून मतमोजणी रविवारी (ता.१६) रोजी होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com