दांगट, पायमोडे, कोरडे, डुंबरे यांचा ‘शिवनेरी भूषण’ पुरस्काराने सन्मान

दांगट, पायमोडे, कोरडे, डुंबरे यांचा 
‘शिवनेरी भूषण’ पुरस्काराने सन्मान
Published on

जुन्नर, ता. १९ : किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या मानाच्या शिवनेरी भूषण पुरस्काराने  विविध क्षेत्रातील चौघांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत  सन्मान करण्यात आला.
मराठा सेवा संघाने आयोजित केलेल्या अभिवादन सभेत यंदाचा शिवनेरी भूषण पुरस्कार जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट, आरोग्य दूत राजाभाऊ पायमोडे, पर्यावरणप्रेमी जालिंदर कोरडे व कॅन्सर सर्जन डॉ. अमोल डुंबरे यांना समारंभपूर्वक देण्यात आला. शाल, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
शिवजयंती महाउत्सव समितीचे आयोजक आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, भाजप नेत्या आशा बुचके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी विजय घोगरे, बाळासाहेब घुले, ॲड. राजेंद्र बुट्टे, गणेश महाबरे आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com