‘विघ्नहर’च्या चार जागांसाठी आज होणार मतदान
जुन्नर, ता.१४ : निवृत्तीनगर-धालेवाडी (ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या चार जागांसाठी (शनिवारी, ता.१५) होणाऱ्या मतदान होणार आहे. यासाठी शुक्रवारी (ता.१४) मतदान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.
मतदान शनिवारी (ता.१५) सकाळी ८ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. यासाठी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी क्रमांक एक, दोन व तीन व शिपाई प्रत्येकी २० याप्रमाणे १०० कर्मचारी मतदान साहित्य घेऊन शिरोली बुद्रुक येथील श्री निवृत्तीशेठ शेरकर सांस्कृतिक भवन येथून मतदान केंद्रावर रवाना झाले.
चार जागांसाठी एकूण पाच मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी उत्पादक मतदार संघांच्या जुन्नर (३), शिरोली बुद्रुक (५),ओतूर (३), पिंपळवंडी (७), घोडेगाव (२) या चार गटात एकूण वीस मतदान केंद्रे आहेत. एकूण मतदार १९ हजार ६२७ आहेत. मतदान साहित्य वाटप तसेच मतदानाची आकडेवारी घेण्यासाठी गटनिहाय एकूण दहा सहायक महसूल कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
मतदान केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. यात एक पोलिस निरिक्षकासह,सात अधिकारी,पोलिस हवालदार व शिपाई असे एकूण ४० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
निवृत्तीशेठ शेरकर सांस्कृतिक भवन येथील मतमोजणी कक्षामध्ये (रविवार, ता.१६ रोजी) एकूण २० टेबलवर सकाळी नऊ वाजता मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. अंतिम निकाल दुपारी १२ पर्यंत येणे अपेक्षित आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

