

जुन्नर, ता.१८ : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्नर येथील मुख्य बाजार आवारात रविवारी (ता.१६) एक हजार ७७४ कांद्याच्या पिशव्यांची आवक झाली. आवक घटल्याने बाजारभावात किंचितशी वाढ झाली. गेल्या दोन बाजारात बाजारभावात घसरण झाल्याचा परिणाम कांद्याची आवक घटण्यावर झाला आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कल कांदा साठवणुकीकडे वाढला आहे.
रविवारी झालेल्या लिलावात प्रतवारीनुसार प्रति दहा किलोस मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे :- नंबर १ (गोळा)- १७० ते २००,
नंबर १ (सुपर कांदे)- १५० ते १७५, नंबर २ (गोल्टा/गोलटी)- ४० ते १५०, नंबर ३ (बदला)- ८० ते १३०, बटाट्याच्या ६५४ पिशवीची आवक झाली. प्रति १० किलोस १०० ते १८० रुपये बाजारभाव मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.