शिरोलीत अवैध दारू विक्रेत्यांची मुजोरी
जुन्नर, ता. १३ : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथे अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. गावचे ग्रामदैवत मंदिर, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून पन्नास ते शंभर फूट अंतरावर दारू विक्री केली जात आहे. संबंधितांवर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबत गावातील सव्वाशेहून अधिक नागरिकांच्या सह्यांचा अर्ज पोलिसांकडे देण्यात आला असून ग्रामस्थ ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
गावामध्ये पाच ते सहा ठिकाणी अवैध दारूची विक्री होते. यात महिलांचा देखील सहभाग असतो. याविषयी ग्रामसभेत अनेकदा चर्चा देखील झाली, परंतु दारूबंदीचा ठराव केवळ कागदावर राहिल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात ग्रामस्थांनी यापूर्वीही पोलिस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी केल्या, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली, मात्र अवैध दारू विक्री पुन्हा सुरू झाली. पोलिस कारवाईच्या वेळी दारू विक्रेते आपल्या कुटुंबातील बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या व्यक्तींची नावे पोलिसांना देऊन प्रशासनाची फसवणूक करतात. पोलिस कारवाई नंतर कायद्याचा आधार घेऊन स्वतःची सोडवणूक करून घेतात व पुन्हा अवैध दारूची विक्रीचा व्यवसाय सुरू करतात.
तक्रारदार व्यक्तीस गुंड प्रवृत्तीच्या मद्यपींकडून दमदाटी व मारहाण केली जाते. त्यामुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्यास कोणी धजावत नाही. त्यामुळे दारूविक्रेत्यांची मुजोरी वाढली असून, त्यांच्या कुटुंबातील टारगट मुले शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींना बस थांबा, तसेच शाळा परिसरात जाऊन त्रास देतात. काही मुलींनी व पालकांनी याबाबत शाळा प्रशासन व ग्रामस्थांकडे तक्रारही केली होती.
अवैध दारू विक्री करणाऱ्या कुटुंबातील गुंडप्रवृत्तीच्या मुलांनी काही मद्यपींच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या यात्रोत्सवाच्या सांकृतिक कार्यक्रमात गोंधळ घालत गावाला वेठीस धरण्याचा प्रयत्न प्रयत्न केला. यामुळे गावातील सामाजिक शांततेचा भंग झाला असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. गुंडप्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई कधी होणार? गावातील अवैध दारूविक्री बंद होणार कधी? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

