‘विघ्नहर’ला उत्कृष्ट ऊस विकासाचा प्रथम पुरस्कार

‘विघ्नहर’ला उत्कृष्ट ऊस विकासाचा प्रथम पुरस्कार

Published on

जुन्नर,ता. ३ : नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लिमिटेड यांच्यावतीने दिला जाणारा देशातील उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट ऊस विकासाचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास प्रदान करण्यात आला, अशी माहिती अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.
गळीत हंगाम २०२३-२४ साठी देण्यात आलेला हा पुरस्कार नवी दिल्ली येथे गुरुवार (ता.३) ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीयमंत्री निमुबेन जयंतीभाई बांभनिया तसेच माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप,कार्यकारी संचालक भास्कर घुले, संचालक व अधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारला.
शेरकर म्हणाले की, विघ्नहर कारखान्यास यापूर्वी अनेक राष्ट्रीय व राज्य स्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.‘विघ्नहर’चे संस्थापक स्व.निवृत्तिशेठ शेरकर व स्व.सोपानशेठ शेरकर यांचा शेतकरी हित व पारदर्शक कारभार याच मार्गदर्शक तत्त्वावर वाटचाल सुरू आहे. या पुरस्काराने विघ्नहरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मागील वर्षी केलेल्या विस्तारीकरणमुळे गाळप क्षमता ७,५०० टन झाली आहे. त्याची चाचणी घेण्यात आली, असे शेरकर यांनी सांगितले.

कारखाना लागवड हंगाम २०२५-२६ पासून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीचा अवलंब कारखाना बेणे मळा व प्रगतशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर करणार आहे.विघ्नहर कृषी अमृत (फर्मेटेड सेंद्रिय खत) ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रती एकरी दहा बॅग प्रमाणे उधारीने पुरवठा करण्यात येत आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत स्वखर्चाने व्हिएसआय आयोजित ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दरवर्षी पाठविले जाते. कारखान्यामार्फत प्रती एकरी १०० टन व त्यापुढील ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना गौरविण्यात येते. प्रतिएकरी ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात प्रती एकरी ऊस उत्पादनात वाढ आहे.
- सत्यशील शेरकर, अध्यक्ष विघ्नहर सहकारी साखर कारखाना

08738

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com