गोळेगावात कोकणे दांपत्याने कष्टाने फुलविली केळीची बाग
जुन्नर, ता.१५ : गोळेगाव (ता.जुन्नर) येथील विजय व सुचित्रा कोकणे दांपत्याने केळीची फुलविली आहे. केळीचे सोमवारपासून (ता.१४) हार्वेस्टिंग सुरू आहे. केळीच्या घडाचे वजन सरासरी वजन ४५ ते ५० किलो भरले आहे. त्याला प्रतिकिलो २१ रुपये बाजारभाव मिळाला आहे. एका घडाचे सर्वाधिक वजन ५६ किलो इतके आढळून आले आहे.
केळी पिकाला उन्हाळ्यात उन्हाची तर हिवाळ्यात थंडीची झळ बसू नये म्हणून प्रयत्न केले. पहाटे उठून शेतात कामे केली. केळी लागवडीनंतर मशागतीची सर्व कामे घरच्या घरी केली. नशिबाने देखील चांगली साथ दिली. हार्वेस्टिंग ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील, असे कोकणे दांपत्याने सांगितले.
गोळेगाव येथील आपल्या संपूर्ण साडेतीन एकर क्षेत्रात कोकणे यांनी केळी लागवडीसाठी पाटील बायोटेक जी नाईन रोपाची निवड केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केळी लागवड केली.
थंडीच्या दिवसात कॅल्शिअम नायट्रेट ड्रिपमधून सुरू ठेवले. पहाटे उठून केळीमध्ये डस्टिंग केली. उन्हाळ्याच्या झळी पासून संरक्षण व्हावे यासाठी वारंवार रेन पाईपने पाणी व पाट पाणी देऊन पाणी देऊन उन्हाळ्यात उन्हापासून केळी वाचल्या , केळीची संपूर्ण कामे घरच्या घरीच केली. घरी एक कायमस्वरूपी मुलगा कामाला होता. अडचणीच्या काळात त्याने आम्हाला खूप साथ दिली. आम्ही दोघे पती-पत्नी व कामाला असणारा मुलगा सुभाष घोगरे मिळून केळीची सर्व कामे केली. केळी लागवडीसाठी फक्त मजूर घेतले. त्यानंतर मजुरीची माणसे न घेता घरच्या घरीच ही सगळी कामे सुभाषच्या मदतीने कोकणे यांनी केली.
लागवडीनंतर वरचेवर पाट पाणी दिले, त्याचबरोबर इनलाईन व रेन पाइपचेही पाणी चालू ठेवले. त्यानंतर शेणखत, कोंबडखत, सुपर फॉस्फेट एकत्र मिसळून बेडवर पसरवले. दोन ते तीन महिन्यात रोपांची अडीच तीन फुटापर्यंत चांगली वाढ झाली. सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केला यामुळे केळी रोपाच्या मुळ्या चांगल्या प्रमाणात वाढल्या, पोंगा भरणीमुळे चांगला बुंधा पकडायला लागला.
- विजय कोकणे, केळी उत्पादक
08800
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.