जुन्नर तालुक्यातील गट-गणांत मोठे फेरबदल
जुन्नर, ता. १८ : जुन्नर तालुक्यातील गट गणांत मोठे फेरबदल झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य संख्येत एकने, तर पंचायत समिती सदस्यांची संख्या दोनने वाढली आहे.
गट-गण रचना करताना भौगोलिक परिस्थिती विचारात घेतली नसल्याची चर्चा असून याविरोधात हरकती दाखल करण्यात येणार आहेत. जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ८ गट व पंचायत समितीसाठी १६ गण आहेत.
२००७ व २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत देखील ८ गण, १६ गट होते. नव्या रचनेत ही तत्कालीन रचना कायम ठेवणे अपेक्षित होते. रचना करताना काही ठिकाणी जवळची गावे तोडली, तर दूर अंतरावरील गावे जोडली असल्याचे जिल्हा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब देवाडे यांनी सांगितले. बारव तांबे गट रचना करताना पूर्वीच्या तांबे-पाडळी गटातील गावे तोडली आहेत. आदिवासी गावे बहुल असणाऱ्या गटात पिंपळगाव सिद्धनाथ गावाचा समाविष्ट केल्याने ते पूर्वीप्रमाणे खुल्या गटात जोडण्याची मागणी असल्याचे संजय खंडागळे यांनी सांगितले. मागील वेळी खामुंडी गाव ओतूर गटात राहिल्याने विकास निधीला दुजाभाव केला गेला. यामुळे खामुंडी गाव पिंपळवंडी गटात घ्यावे, असे संदीप गंभीर यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यातील गट-गण व त्यातील समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे
उदापूर गण : उदापूर, पिंपळगाव जोगा, भोईरवाडी, आळू, अहिनवेवाडी, मांदारणे, पाच घरवाडी, आंबेगव्हाण, चिल्हेवाडी, मांडवे, मुथाळणे, कोपरे, जांभुळशी, कोल्हेवाडी, सांगनोरे, खुबी, खिरेश्वर, करंजाळे, पारगाव तर्फे मढ, बगाडवाडी, तळेरान.
डिंगोरे गण : डिंगोरे, नेतवड, माळवाडी, बल्लाळवाडी, पांगरी तर्फे ओतूर, आलमे, पांगरी तर्फे मढ, कोळवाडी, मढ, सितेवाडी, वाटखळे, गोळेगाव, अलदरे, हातबन.
गट : ओतूर-धालेवाडी तर्फे हवेली.
ओतूर गण : ओतूर, रोहकडी, डुंबरवाडी, खामुंडी.
धालेवाडी तर्फे हवेली गण : धालेवाडी तर्फे हवेली, धोलवड, ठिकेकरवाडी, हिवरे खुर्द, हिवरे बुद्रूक, भोरवाडी (हिवरे बुद्रूक), विघ्नहरनगर, ओझर, तेजेवाडी, शिरोली खुर्द, कुमशेत, शिरोली बुद्रूक.
पिंपळवंडी गण : पिंपळवंडी, चाळकवाडी, भटकळवाडी, वैशाखखेडे, काळवाडी, उंब्रज नंबर एक, उंब्रज नंबर दोन, पिंपरीपेंढार, गायमुखवाडी, नवलेवाडी, जांभूळपट.
आळे गण : आळे, वडगाव आनंद, पादीरवाडी, आळेफाटा, संतवाडी, कोळवाडी.
राजुरी गण : राजुरी, उंचखडकवाडी, गुळुंचवाडी, नळावणे, आणे, आनंदवाडी, पेमदरा, शिंदेवाडी.
बेल्हे गण :बेल्हे, यादववाडी, कोंबरवाडी, गुंजाळवाडी(बेल्हे), बांगरवाडी, तांबेवाडी, रानमळा, साकोरी तर्फे बेल्हे, मंगरूळ, झाप.
बोरी बुद्रूक गण : बोरी बुद्रूक, जाधववाडी, निमगावसावा, औरंगपूर, पारगाव तर्फे आळे, शिरोली तर्फे आळे, सुलतानपूर, पिंपरीकावळ.
खोडद गण : खोडद, कांदळी, नगदवाडी, वडगाव कांदळी, बोरी खुर्द, येडगाव, भोरवाडी.
नारायणगाव गण : नारायणगाव, बागलोहरे, धनगरवाडी.
वारूळवाडी गण : वारूळवाडी, गुंजाळवाडी(आर्वी), मांजरवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव.
सावरगाव गण : सावरगाव, निमदरी, खिल्लारवाडी, आगर, हापूसबाग, बादशहातलाव, अमरापूर, धामणखेल, खानापूर, बस्ती,
निमगाव तर्फे म्हाळुंगे, वडगाव सहानी, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, कुरण, आर्वी.
कुसूर गण : कुसूर, निरगुडे, सोमतवाडी, खानगाव, येणेरे, विठ्ठलवाडी, काले, दातखिळेवाडी, बुचकेवाडी, पारुंडे, विठ्ठलवाडी (वडज), काटेडे, वडज, चिंचोली.
बारव गण : बारव, पाडळी, पिंपळगाव-सिद्धनाथ, माणिकडोह, खामगाव, गोद्रे, हडसर, राजुर, उंडेखडक, निमगिरी, खटकाळे, खैरे, केवाडी, जळवंडी, हिरडी, खडकुंबे, देवळे, चिंचेचेवाडी, अंजनावळे.
तांबे गण : तांबे, बेलसर, सुराळे, तेजुर, चावंड, केळी, माणकेश्वर, आपटाळे, पूर, शिरोली तर्फे कुकडनेर, घाटघर, फांगुळगव्हाण, बोतार्डे, बोतारडे तर्फे मिन्हेर, राळेगण, शिंदे, वानेवाडी, धालेवाडी तर्फे मिन्हेर, सोनावळे, घंगाळदरे, सुकाळवेढे, इंगळूण, शिवली, अंबोली, भिवाडे बुद्रूक, भिवाडे खुर्द, आंबे, पिंपरवाडी, हातवीज.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.