जुन्नरला शिक्षकांची ८५ रिक्त पदे

जुन्नरला शिक्षकांची ८५ रिक्त पदे

Published on

जुन्नर, ता. ३० : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांची ८५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा तात्पुरता पदभार हा पदवीधर शिक्षक व उपशिक्षक सांभाळत आहेत. रिक्त पदांमुळे तब्बल १२ वर्षांनंतर लाभलेल्या पूर्णवेळ गटशिक्षणाधिकाऱ्यांना प्रशासकीय व शैक्षणिक प्रश्नांच्या आवाहनाला सामोरे जावे लागणार आहे.
तालुक्यातील १६ हजार ३१८ विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडे ९६५ शिक्षक कार्यरत आहेत. शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमावर रिक्त पदांचा परिणाम होत असल्याने ही पदे तत्काळ भरण्याची मागणी तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांकडून होत आहे.
तालुक्यात केंद्रप्रमुखांची २५ पदे रिक्त असल्याने या केंद्रांचा तात्पुरता पदभार त्या केंद्रातील पदवीधर शिक्षकांकडे तर काही ठिकाणी उपशिक्षकांकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे अध्यापनासाठी वेळ नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
तसेच शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची सहा पदे रिक्त आहेत. यामुळे उपलब्ध चार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना दहा बीटचे पर्यवेक्षण करावे लागत आहे. शासनाने केंद्र प्रमुखांची पदोन्नतीने केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांची ५० टक्के पदे तत्काळ भरावीत तसेच सरळ सेवेने ५० टक्के पदे भरण्यासाठी शासन अधिसूचनेनुसार परीक्षा आयोजित करावी. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांकडे लेखी मागणी केली असल्याचे मोहन नाडेकर यांनी सांगितले.

शासन सध्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात व्यस्त आहे. वास्तविक प्रत्येक तालुक्यात मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची अनेक पदे रिक्त आहेत. शिक्षक संघटनांनी अनेकदा मागण्या करूनही ही पदे भरली गेली नाहीत. अनेक केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांचेकडे तीन -चार केंद्रांचा व बीटांचा अतिरिक्त पदभार आहे. बदल्यांच्या अगोदर जर ही पदे भरली गेली असती तर शिक्षकांना पदोन्नतीसाठी संधी मिळाली असती व तेवढ्याच जागा बदलीपात्र शिक्षकांना उपलब्ध झाल्या असत्या व शिक्षक अतिरिक्त ठरले नसते.
- तानाजी तळपे, माजी सरचिटणीस, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ.

जुन्नर तालुक्याची आकडेवारी :
एकूण प्राथमिक शाळा - ३५०, एकूण केंद्र - ३२, एकूण शिक्षक - ९६५.

शिक्षण विभागातील मंजूर पदे, कार्यरत पदे व रिक्त पदे पुढीलप्रमाणे :
गटशिक्षणाधिकारी - १-१-०
शिक्षण विस्तार अधिकारी - १०-०४-०६
केंद्रप्रमुख - ३२-०७-२५
मुख्याध्यापक - २९-१४-१५
पदवीधर शिक्षक - १२३-११९-०४
उपशिक्षक - ८५०-८१५-३५
वरिष्ठ सहाय्यक - २-२-०
कनिष्ठ सहायक -२-२-०
परिचर - १-१-०
एकूण - १०५०-९६५-८५.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com