चिंचवडच्या धनेश्वर स्पोर्ट्स कबड्डी संघाला वायुकुमार चषक
जुन्नर, ता. १९ : वडगाव सहानी (ता. जुन्नर) येथील राज्यस्तरीय निमंत्रित मॅटवरील कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात चिंचवडच्या धनेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या संघाने तर महिला गटात पुणे येथील राजमाता जिजाऊ संघाने वायुकुमार चषक पटकाविला.
येथील वायुकुमार विकास मंडळ व राधाकृष्ण महिला मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त महिला व पुरुष खुल्या गटाच्या मॅटवरील कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले होते. यंदाचे स्पर्धेचे ५३ वे वर्ष होते. राज्याच्या विविध भागांतून पुरुष गटात ३८ व महिला गटात २६ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष हंबीरराव वाबळे, उपाध्यक्ष संतोष तांबोळी व सेक्रेटरी नितीन तांबोळी यांनी दिली.
पुरुष गट : प्रकाशतात्या बालवडकर फाउंडेशन, पुणे - द्वितीय, काळभैरवनाथ कबड्डी संघ, रहाटणी - तृतीय व चेतक स्पोर्ट्स क्लब संघ, बालेवाडी - चतुर्थ क्रमांक मिळाला.
महिला गट : कला, क्रीडा प्रकल्प, पिंपरी चिंचवड - द्वितीय. बारामती स्पोर्ट्स ॲकॅडमी - तृतीय व द्रोणा स्पोर्ट्स, पुणे - चतुर्थ क्रमांक मिळाला.
स्पर्धेसाठी दोन लाख १० हजाराची सांघिक व वैयक्तिक बक्षीसे व चषक ठेवण्यात आला होता.
पुरुष व महिला गटात वैयक्तिक सर्वोत्कृष्ट चढाई - श्रुतिका व्यवहारे, राहुल वाघमारे, सर्वोत्कृष्ट पकड - कोमल राठोड, शिस्तबद्ध संघ - जागृती प्रतिष्ठान पुणे, रेणुकामाता स्पोर्ट्स क्लब, चांडोली. सर्वोत्कृष्ट खेळाडू - निकीता पडवळ. उदयोन्मुख खेळाडू - साक्षी बारटक्के, आर्यन राठोड यांना बक्षीसे देण्यात आली.
पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार अतुल बेनके, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष सुनीता शिंदे, विशाल पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण पारखे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी संतोष चव्हाण, प्रियांका शेळके, सरपंच उज्ज्वला वाबळे, उपसरपंच अविनाश वाबळे, माजी अध्यक्ष अतुल वाबळे, डॉ. उमाकांत वाबळे, तुषार वाबळे, स्नेहल तांबोळी, अरुण तांबोळी, मधुकर भोर, शिवाजी भोर, महेश शेळके, सुशांत शिंदे, सूरज वाजगे, बाबा परदेशी, विनय वाबळे, पूजा बुट्टे, गुलाब पारखे उपस्थित होते.
पंच म्हणून दत्ता झिंजुर्डे, चिंतामण वाबळे, उमेश चिखले, किशोर सरोदे व मुटके यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.