जुन्नरच्या आदिवासी भागात नाचणीची लागवड

जुन्नरच्या आदिवासी भागात नाचणीची लागवड

Published on

जुन्नर, ता.२३ : जुन्नरच्या आदिवासी भागात खरीप हंगामातील नाचणीची लागवड पूर्ण झाली आहे. राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळ्याच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक समजले जाते. आरोग्याच्या दृष्टीने पूर्णान्न असलेल्या नाचणी पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी पिंपरवाडी (ता.जुन्नर) येथे नाचणीच्या १७ प्रकारच्या बियाणांची बँक साकारतेय. यासाठी येथील शेतकऱ्यांनी नाचणीची लागवड पूर्ण केली आहे.
दुर्गम पिंपरवाडीत प्रथमच महाराष्ट्र फाउंडेशन पंचम एकात्मिक ग्राम विकास प्रकल्पाचा हा प्रयोग राबविला असून सुमारे चार एकर क्षेत्रात आठ शेतकऱ्यांनी नाचणीच्या विविध प्रजातीची लागवड केली असल्याचे ग्राम समन्वयक गणपत घोडे यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यात नाचणीचे सरासरी क्षेत्र १०९ हेक्टर इतके असून, या क्षेत्रावरील नाचणीची लागवड पूर्ण झाली आहे. पिंपरवाडी येथील साकारत असलेल्या नाचणी बँकेमुळे भविष्यात तालुक्यातील नाचणीचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सांगितले.
नाचणीच्या विविध प्रकारची लागवड केलेले शेतकरी व नाचणी प्रकार पुढील प्रमाणे आहे. वसंत घोडे (दसर बेंद्री,पिवळ बेंद्री),गोविंद घोडे(टी१४), गोविंद ढेंगळे (शितोळी मुटकी),रामदास घोडे (शिनपडी गरवी), नवनाथ घोडे (टी१५),पांडुरंग घोडे(जबाड स्थानिक), सखाराम घोडे(ढवळ पेरी)तुकाराम घोडे (शित मुटकी, दापोली) याचबरोबर इतरही शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे स्थानिक नाचणीची लागवड केली असून त्याचे क्षेत्र वेगळे आहे.
नाचणीतून शरीराला मिळणारे फायदे लक्षात घेतले तर त्या तुलनेत नाचणी पिकाला अपेक्षित दर मिळत नाही. शेतातून काम करण्यासाठी मनुष्यबळ मिळत नाही ही फार मोठी अडचण असल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

09042

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com