जुन्नरकरांनी सामाजिक सलोखा जोपासावा

जुन्नरकरांनी सामाजिक सलोखा जोपासावा

Published on

जुन्नर, ता.३१ : जुन्नरमधील नागरिकांनी गणेशोत्सव व पैगंबर जयंती हे उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडावेत. यानिमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्य कायम ठेवावे व सामाजिक सलोखा जोपासावा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी केले.
शांतता समितीची बैठक व पोलिस दलाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गणराया पुरस्कार २०२४ वितरण प्रसंगी (ता.३०) पाटील बोलत होते. अनंत चतुर्दशीला विसर्जन होणाऱ्या मानाच्या पंधरा गणेश मंडळांपैकी पणसुंबा पेठेतील श्री नवतरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम क्रमांकाचे तर खालचा माळीवाडा गणेश मंडळाला द्वितीय व रविवार गणेश मंडळास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
यावेळी सातव्या व ९ व्या दिवशी विसर्जन होणाऱ्या मंडळांपैकी प्रथम दोन क्रमांकाच्या अनुक्रमे राजमाता जिजाऊ महिला विकास मंच गणेश मंडळ, शिवयोध्दा गणेश मंडळ, कुंभारआळी, त्रिमूर्ती गणेश मंडळ, सराईपेठ व साई गणेश मंडळ दिल्लीपेठ यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

परीक्षक म्हणून विलास कडलक, के.जी.नेटके, विनायक रावळ, विनायक खोत, अतुल भगत यांनी काम पाहिले. यावेळी समाजीम सलोखा जपणाऱ्या जश्ने मिलादुन्नबी ईद ए मिलाद कमिटी, समन्वय ठेवणाऱ्या जुन्नर शहर पत्रकार संघास तसेच गेली दहा वर्षे पोलिस बांधवांना तंदुरुस्त बंदोबस्त अंतर्गत गणेशोत्सवात पौष्टिक आहाराचे वाटप करणाऱ्या तनिष्का व्यासपीठाच्या गटनेत्या डॉ. उज्वला शेवाळे तसेच सदस्या वैष्णवी चतुर, अंजली दिवेकर, महानंदा हिरेमठ व सलमा सय्यद यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी चरण कोल्हे, विविध मंडळाचे पदाधिकारी व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. प्रफुल्ल बोऱ्हाडे, फिरोज पठाण, श्रीकांत जाधव, संतोष परदेशी, हरीश भवळकर आदींनी मनोगतातून सूचना मांडल्या. सहाय्यक फौजदार अनिल लोहकरे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन पोलिस उपनिरीक्षक तिटमे यांनी केले. पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी आभार मानले.

09075

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com