जुन्नरला मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

जुन्नरला मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

Published on

जुन्नर, ता. ६ : जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. प्रभागातील नगरसेवक पदांची आरक्षण सोडत बुधवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता नगर परिषद सभागृहात होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी दिली.
महिला आरक्षणामुळे इच्छुक पुरुष वर्गाच्या आशा मावळल्या आहेत, तर महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. इच्छुकांनी पत्नीसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. जुन्नर नगर परिषदेची स्थापना १८६१ मधील असून, सर्वात जुनी नगर परिषद म्हणून ओळखली जाते. मागील निवडणुकीसाठी एकूण मतदार सुमारे २४ हजार ३६ होते. यामध्ये महिला मतदार संख्या ११ हजार ८७६ होत्या. मतदान केंद्र संख्या २५ होती. या मतदार संख्येत थोडीफार वाढ होणे अपेक्षित आहे.
शहरात नागरिकांच्या मागास प्रवर्गात प्रामुख्याने माळी, तेली, कुंभार, न्हावी, सोनार, शिंपी समाजाची मते असून, ही संख्या सुमारे आठ ते नऊ हजार असल्याचे सांगण्यात येते. याचबरोबर मुस्लिम समाजातील महिलांकडे देखील या प्रवर्गाचे दाखले असल्याने मुस्लिम समाजातूनही उमेदवारीसाठी महिला इच्छुक आहेत.
जुन्नर नगर परिषदेत यापूर्वी ओबीसी महिलांनी नगराध्यक्ष पद उत्तम प्रकारे सांभाळले आहे. ओबीसी महिलांनी निवडणुकीसाठी स्वतः हुन पुढे यावे. शहराचा कारभार पारदर्शक- भ्रष्टाचार मुक्त व सर्व समावेशक करण्यासाठी निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे, असे मत माजी गटनेते मधूकर काजळे यांनी व्यक्त केले आहे.
ही निवडणूक महायुती म्हणून होईल असे वातावरण सध्या तरी दिसत नाही. शिवसेना व राष्ट्रवादी काँगेस यांच्याकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. भाजपही निवडणुकीसाठी उमेदवार देण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडे इच्छुक मर्यादित असल्याने आघाडीचा एकच उमेदवार होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे.

09293

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com