शिवरीकरांचा दुष्काळावर मात करण्यासाठी संकल्प

शिवरीकरांचा दुष्काळावर मात करण्यासाठी संकल्प
Published on

खळद, ता. २८ : शिवरी (ता.पुरंदर) येथे सतत पडणाऱ्या दुष्काळाने येथील शेतकरी हैराण झाला आहे. यावर कायमस्वरूपी मात व्हावी या हेतूने ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक नवीन संकल्प केला आहे. कऱ्हा नदीचे पाणी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून गावच्या शिवारात फिरवण्याचा निर्णय या ग्रामस्थांनी घेतला आहे.
गावातील पालखी विसावा सभामंडपामध्ये ग्रामस्थांची दुसरी बैठक पार पडली. शिवरी गावातील शेतकरी कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी अधिक मेहनत घेतात. तर या भागात फुलशेती, फळबागा अधिक आहेत. सध्या दुष्काळजन्य परिस्थितीत शेतात उभी पिके ही जळण्याच्या मार्गावर असून लाखो रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतमजुरांना काम नाही, जनावरांना चारा, पाणी नाही तर पिके डोळ्यासमोर जळू लागली आहेत. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात भूगर्भाची पाण्याची पातळी वाढवून कायमस्वरूपी हा भाग सुजलाम्‌ सुफलाम्‌ कसा होईल, यासाठी आम्ही कऱ्हा नदीचे पाणी शिवरी गावच्या शिवारात ओढ्या नाल्यामध्ये सोडण्यासाठी उपसा सिंचन योजना राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजाभाऊ क्षीरसागर यांनी सांगितले.

योजनेसाठी गावातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून नियोजित नोंदणीकृत पाणी वापर संस्था स्थापन करून ही योजना राबविली जाईल. शेतकरी सुरुवातीला आपला स्वतःचा वाटा यामध्ये टाकणार आहे व पुढील निधीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून सी. एस. आर. फंडातून निधी मिळावा यासाठी संपूर्ण गाव सामूहिकरीत्या प्रयत्न करणार आहे.
- आत्माराम कामथे, माजी अध्यक्ष, यमाई माता देवस्थान ट्रस्ट

बैठकीस पुरंदर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक बबनराव कामथे, अध्यक्ष नवनाथ कामथे, राजाभाऊ क्षीरसागर ,नारायण कामथे, विकास कामथे, किशोर चव्हाण, महादेव जाधव, रामचंद्र कामथे, अजित कामथे, वसंत शिवरकर, बबन लिंबोरे, बबन कामथे, विजय टेकवडे, शांताराम कामथे, अंकुश कामथे, वासुदेव लिंबोरे, तुकाराम कांबळे, नाथा कामथे, बाळासाहेब काळाने, साहेबराव बडदे यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

02219

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com