पुरंदरमध्ये ७ मार्चला गतिमान प्रशासन कार्यक्रम
खळद, ता. ४ : नागरिकांना पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख प्रशासन उपलब्ध व्हावे यासाठी कार्यालयीन कामकाजास गतिमानता, निर्णयक्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित व्हावे यासाठी राबविण्यात येत असलेल्या १०० दिवसांच्या मोहिमेअंतर्गत पुरंदर तालुक्यात गावोगावी ७ मार्च रोजी विशेष शिबिर राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सर्व मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांना दिल्या आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांची वारसनोंद, लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत कामकाज, पाणंद रस्ते व गाव नकाशावरील रस्ते खुले करणे,
विविध दाखले वाटप शिबिर, प्रलंबित फेरफार निर्गती व निकाल प्रत वाटप यांसह विविध कामे होणार आहेत.
या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन मंडलाधिकारी दुर्गादास शेळकंदे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

