खळद येथे कऱ्हा नदीचे जलपूजन
खळद, ता.३०: खळद (ता.पुरंदर) येथे कऱ्हा नदीला मे महिन्यातच पाणी आल्याने ग्रामस्थ समाधानी झाले. ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ खळद यांनी कऱ्हा नदी तीरावर आनंदोत्सव साजरा करीत कऱ्हा माईचे विधिवत जलपूजन केले. यावेळी या विधीचे पौराहित्य ग्रामपुरोहित अजित खळदकर यांनी केले.
कऱ्हा नदी ही हंगामी वाहणारी नदी असून, साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये या नदीला पाणी येथे तर पुढे डिसेंबर -जानेवारीपर्यंत हे पाणी राहते, यातून शेतीसाठी नागरिकांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होतो. तर येथे असणाऱ्या उपसा सिंचन योजना, पाट पाणी योजना, शेतकऱ्यांच्या वैयक्तिक उपसा योजना यांना या पाण्याचा मोठा लाभ होऊन परिसरामध्ये कऱ्हाचे पाणी फिरले जाते.त्यामुळे नदी जरी चार-पाच महिने वाहिली तरीही हे पाणी शेत शिवारात गेल्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होते.
यावर्षी प्रथमच उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये नदीला पाणी आले असल्याने यावर्षी कऱ्हानदी ही जास्त काळ वाहील व खरीप, रब्बी दोन्ही हंगामामध्ये पिकांना यांचा फायदा होईल, असा विश्वास शेतकऱ्यांना वाटत असून शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.
आनंदित झालेल्या शेतकऱ्याने शुक्रवारी (ता.३०) कऱ्हानदीच्या पात्रामध्ये साडी चोळी अर्पण करीत विधिवत पूजा करीत जलपूजन केले व एकमेकांच्या अंगावरती कऱ्हेचे पाणी शिंपडीत आपला आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी सरपंच संदीप यादव, उपसरपंच आशा रासकर, सदस्य छाया कामथे, रोहिणी कामथे, नम्रता कादबाने, शारदा कामथे, दशरथ कादबाने, भाऊसाहेब कामथे, योगेश कामथे, ग्रामसेवक महेंद्र लोणकर, सुरेश रासकर, संजय कामथे, वृषाली कादबाने, यशवंत इभाड, अंकुश कामथे, कैलास खळदकर, निकिता वडावकर, आशा आबनावे, प्रकाश जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
03067
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.