
खळद, ता. २४ : श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जात असताना श्री संत सोपान काकांच्या सासवड नगरीचा दोन दिवसाचा पाहुणचार करून मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी नगरीकडे मंगळवारी (ता. २४) मार्गस्थ झाला. यावेळी श्री क्षेत्र यमाई शिवरी येथे दुपारचा विसावा झाला. यावेळी पालखीचे स्वागत केले.
यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, सारिका इंगळे, दत्तात्रेय झुरंगे, बबनराव कामथे, सरपंच प्रमोद जगताप, यमाई माता देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष नवनाथ कामथे, उपाध्यक्ष वासुदेव लिंबोरे, राजेंद्र क्षिरसागर, ज्ञानेश्वर कामथे, धनंजय कामथे ग्रामसेविका शीतल भुजबळ, तुकाराम कांबळे यांच्यासह विविध मान्यवरांनी स्वागत केले.
यावेळी सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिस, पोलिस पाटील, देवस्थान, ग्रामपंचायत पदाधिकारी, स्थानिक स्वयंसेवक यांनी दर्शनाची व्यवस्था पाहिली.
येथील विसाव्याला विशेष महत्त्व असून या ठिकाणी आळंदी येथून पालखीने वारीसाठी प्रस्थान केल्यानंतर प्रथमच माऊलींच्या पादुका पालखीतून खाली घेऊन त्या यमाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात नेल्या जातात. येथे अभिषेक, महापूजा, महानैवेद्य आदी विधी संपन्न होतात. यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ, सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, स्वामीदास गणेशानंद महाराज सर्व विश्वस्त उपस्थित होते.
हा अलौकिक भेट सोहळा आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात. तर शिवरी, खळद, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, वाळुंज, निळुंज, शिंदेवाडी, तक्रारवाडी, पांगारे, भाटमळवाडी सह परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
दुकानांची मोठी रेलचेल
पालखी सोहळा म्हणजे येथे गावची यात्राच असते यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर दुकानांची रेलचेल पाहावयास मिळाली. खरेदीसाठी लहान मुले, महिलांनी मोठी गर्दी केली होती. तर लहान मुलांसाठीही विविध प्रकारचे खेळ आल्याने येथे निर्माण झालेल्या उत्साही यात्रा वातावरणाचा शिवरीसह परिसरातील भाविकांनी लाभ घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.