शिवरी विद्यालयात आईसोबत वृक्षारोपण
खळद, ता. ५ : शिवरी (ता. पुरंदर) येथे महात्मा जोतिराव फुले विद्यालय व श्री शंकरराव मुकुटराव कामथे कनिष्ठ महाविद्यालय येथे ‘आईसोबत एक झाड’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळा परिसरामध्ये प्रतिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांनी आपल्या आईसोबत वृक्षारोपण केले.
विद्यालयातील शरदचंद्र पवार सभागृहामध्ये शनिवारी (ता. ५) माता पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी शाळेच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या आईला व आईसोबत एक झाड घेऊन येण्याची विनंती केली होती. त्याला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रातिनिधिक वृक्षारोपण केले. यावेळी नवनाथ कामथे, विकास कामथे, धनंजय कामथे, वासुदेव लिंभोरे, विकास लिंबोरे, अमर कामथे, सुरेश इंगळे, विजय टेकवडे, रामचंद्र कामथे, संजय लिंभोरे, राणी कामथे, पौर्णिमा कामथे, दीपाली शिवरकर, सोनाली कामथे, शीतल लिंबोरे, सारिका कामथे, पूजा नवले, कविता कामथे, अश्विनी कामथे, स्वाती कोल्हे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन शिक्षक जीविता कदम, जयश्री गोरडे, सारिका टिळेकर, शबनम पठाण, संजय गोसावी, वंदना मडके आदी शिक्षकांनी केले. नितीन कोलते यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य रमेश महाडीक यांनी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.