शिवरीतून स्वामी समर्थांच्या पालखीचे प्रस्थान

शिवरीतून स्वामी समर्थांच्या पालखीचे प्रस्थान

Published on

खळद, ता. ४ : शिवरी (ता. पुरंदर) येथील तुकाई मंदिराजवळ असणाऱ्या श्री स्वामी समर्थ गुरू पादुका मठ येथून परंपरेनुसार श्री स्वामी समर्थ पादुका पालखी सोहळ्याचा यमाई शिवरी ते अक्कलकोट शाही प्रस्थान सोहळा संपन्न झाला. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर स्वामी समर्थांच्या जयघोषाने दुमदुमला होता.
गुरुवर्य अण्णुजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने स्वामीदास गणेशानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सात वर्षापासून हा सोहळा होत आहे.
यावेळी या शाही प्रस्थान सोहळ्यास नारायणपूर देवस्थानचे कल्याण स्वामी, केडगाव येथील १०८ महंत, चौरंगीनाथगडाचे लक्ष्मणनाथजी महाराज, चतुर्थी दत्त पिठाधिश्वर नारायणपूर कल्याण टेंभे स्वामी, भरत क्षीरसागर, अखिल महाराष्ट्र भविष्यकार मंडळाचे अध्यक्ष विनायक शास्त्री परांजपे, स्वप्नील महाराज काळाने, उमेश महाराज शिंदे, सुदाम हिंगे, नीलेश गायकवाड, प्रथमेश शिंदे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व हजारो भक्तगण उपस्थित होते.
मंगळवारी (ता. ४) पहाटे काकडा आरती, प्रक्षालन पुजा, अलंकार पूजा करून दुपारी २ वाजता या शाही प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी रथापुढे अश्व, उंट, हत्ती आणि ५०० बालवारकरी, पारंपरिक वाद्य पथक, संबळ, हालगी वादक पथक, बेंजो, सोपानदेव गुरुकुल आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असा मोठा ताफा होता. टाळ, मृदंगाच्या गजरात हा सोहळा ७.३० वाजता यमाई माता मंदिर परिसरात पोहोचला. येथे ८.३० वाजता महाआरती होऊन हा सोहळा विसावला.
बुधवारी (ता. ५) सकाळी ७ वाजता यमाईदेवी मंदिरात पादुका पूजन, महाआरती होऊन पालखी अक्कलकोटकडे प्रस्थान करणार असून, अकक्लकोट येथे सायंकाळी ५ वाजता खंडोबा मंदिर ते समाधी मठ भव्य शाही मिरवणूक पार पडेल. हा पालखी सोहळा एक दिवसाचा असून, तो बसच्या माध्यमातून संपन्न होणार आहे. संस्थानतर्फे सोहळ्यातील भाविकांना नाष्टा, जेवण, पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे आयोजक स्वामीदास गणेशानंद महाराज यांनी सांगितले.

03341

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com