खळद परिसरात बिबट्याचा वावर
खळद, ता. २७ : येथे बुधवारी (ता. २६) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शेतातून काम करून घरी येणाऱ्या मनीषा रासकर, राजश्री रासकर यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे परिसरामधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
खळद (ता. पुरंदर) गावातून यमाई शिवरी येथे जाण्यासाठी असणाऱ्या कावड मार्गावरती रखमाजीच्या वस्ती ते फुले मळा दरम्यान असणाऱ्या ओढ्यालगत या महिलांना बिबट्याचे दर्शन झाले. याच भागात दोन दिवसांपूर्वी पोल्ट्रीवरील कोंबड्या घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या टेम्पोचालकालाही बिबट्या रस्त्यावरती दिसला होता. गुरुवारी सकाळीही खंडोबाची वाडी परिसरात कऱ्हा नदीलगत बिबट्या दिसल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे नागरिक धास्तावले आहेत. बिबट्याच्या वावरामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे, शेतीच्या कामासाठी बाहेर पडणे अवघड झाले आहे. आतापर्यंत हरेश्वर डोंगराजवळ डोंगर व घाट परिसरात बिबट्या असल्याचे दिसत होते. मात्र आता बिबट्या पूर्णपणे लोकवस्तीच्या जवळ दिसू लागले. त्यामुळे वन विभागामार्फत या भागाची पाहणी करून बिबट्याचा वावर तपासावा व पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

