लोकसहभाग, उपक्रमांतून शिवरी शाळेचा सर्वांगीण विकास

लोकसहभाग, उपक्रमांतून शिवरी शाळेचा सर्वांगीण विकास

Published on

उपक्रमशील शाळा

खळद, ता. १३ : शिवरी (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून संपूर्ण वाळुंज केंद्रात पटसंख्येमध्ये अव्वल राहत, गुणात्मक दर्जाच्या माध्यमातून तालुक्यात एक ‘उपक्रमशील शाळा’ हा नावलौकिक तयार केला आहे.
परिसरामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे मोठ्या प्रमाणावर पेव फुटलेले असताना येथे आपला गुणात्मक दर्जा टिकविल्याने जवळपास १२२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक वर्षात नियमित विविध कार्यशाळा, स्पर्धा व प्रात्यक्षिके आदी उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना चालना देण्याचे काम शाळेमार्फत केले जाते. शाळेमध्ये स्वच्छता, जनजागृती मोहीम, वाचन प्रेरणा उपक्रम, डिजिटल ई लर्निंग वर्ग, संविधान दिन साजरा करून विद्यार्थ्यांनी आपली कलात्मकता व सृजनशीलता सादर केली आहे.

लोकसह‌भागातून शाळेच्या दोन वर्गखोल्यांचे बांधकाम, सीसीटीव्ही कॅमेरे, सामाजिक दायित्व फंडातून (सीएसआर) एसीजीएल कंपनीकडून मुलींसाठी सुमारे पाच लाख रुपयांचे आधुनिक स्वच्छतागृह, इंडियाना कंपनीकडून मुलांसाठी स्वच्छतागृह युनिट, रीड टू रूम संस्थेमार्फत वाचनालय, बोलके व्हरांडे, पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर ई. भरीव कामे लोकसहभागातून झाली आहेत.
शिवरी शाळेमध्ये दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करून भरपूर निधी उभारला जातो. या निधीचा वापर शाळेच्या भौतिक सुविधा वाढविण्यासाठी केला जातो. शिवरी शाळेतील सर्व विद्यार्थी दरवर्षी मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सह‌भागी होऊन केंद्रपातळीवरील गुणवत्ता यादीमध्ये चमकतात. यशवंतराव चव्हाण कला, क्रिडा स्पर्धांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

शाळेतील उपक्रम :
डिजिटल हजेरी
शिवार फेरी
क्रिडा स्पर्धेत नैपुण्य
मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी सहभाग
इंग्रजी शब्द संपत्ती प्रभुत्व
स्पेलिंग व कविता गायन स्पर्धा
विद्यार्थी विषयमित्र
आनंद‌दायी शनिवार
गोष्टीच्या पुस्तकांचे वाचन

आधुनिक सुविधा :
* शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना
आधुनिक, सुरक्षित आणि आनंददायी वातावरण शिक्षण दिले जाते.
* सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण
* मुला-मुलींसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह
* हॅन्डवाॅश स्टेशन
* रूम टू रीड वाचनालय
* सीसीटीव्ही यंत्रणेमुळे शाळा सुरक्षित
* संगणक लॅबमुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख


पुरस्कार
* प्रकाश सदाशिव जगताप - पुणे जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार २०१९-२०२०
* श्वेता ज्ञानेश्वर जगताप - पंचायत समिती पुरंदर आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३-२०२४
* मेघराज वसंत कुंभार - पंचायत समिती पुरंदर आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४-२५
* रूपाली जगदीश हरिहर - तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार २०१५-१६
* निर्मला उदय पोमण - तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार २०१६-१७

यशामागचे शिल्पकार :
या यशामागे मुख्याध्यापक श्वेता जगताप, उपशिक्षक मेघराज कुंभार, प्रकाश जगताप, रूपाली हरिहर, निर्मला पोमण यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रियांका कामथे, सहकारी तसेच पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांचे शाळेच्या विकासात मोलाचे योगदान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com