खळद परिसरातील महिलांकडून शिवसेना उमेदवारांना शुभेच्छा
खळद, ता. ३ : पुरंदर तालुक्यातील बेलसर- माळशिरस जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार रमेश इंगळे, तसेच पंचायत समितीचे उमेदवार माणिक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ खळद येथे आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभाला महिलांचा प्रतिसाद लाभला. या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी दोन्ही उमेदवारांना औक्षण करून त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या व भक्कम पाठिंबा जाहीर केला.
या कार्यक्रमास खळदच्या सरपंच रोहिणी कामथे, उपसरपंच आशा रासकर, माजी सरपंच छाया कामथे, भाऊसाहेब कामथे, वाळुंजच्या सरपंच रेश्मा चवरे, उपसरपंच सुप्रिया इंगळे, संजय कामथे, एखतपूरच्या सरपंच शीतल टिळेकर, तसेच भारतीय शूटिंग संघाच्या प्रशिक्षक विद्या निंबाळकर उपस्थित होत्या.
यावेळी महिलांनी, आमदार विजयबापू शिवतारे यांनी आपल्या आमदारपदाच्या, तसेच जलसंपदा मंत्रिपदाच्या कार्यकाळात पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्याचे नमूद केले. रस्ते, पाणीपुरवठा, वाडी-वस्ती विकास, तसेच विविध पायाभूत सुविधांच्या माध्यमातून त्यांनी केलेला विकास आजही गावोगावी ठळकपणे जाणवत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच, याच विकास प्रक्रियेला पुढे नेण्यासाठी व गावागावातील वाडी-वस्तीपर्यंत निधी पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे डॉ. रमेश इंगळे व माणिक निंबाळकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. आमदार विजयबापू शिवतारे यांचे हात बळकट करण्यासाठी नागरिकांनी या दोन्ही उमेदवारांना सेवा करण्याची संधी द्यावी, त्यामुळे निश्चितपणे परिसराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी महिलांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

