शिवरीत १९२२ नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ
खळद, ता. १६ : शिवरी (ता. पुरंदर) येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १९२२ नागरिकांनी विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेतला. यामध्ये सर्वाधिक ९४६ ऑनलाइन सातबारा व ३५५ ऑनलाइन ८-अ उताऱ्यांचे वितरण करण्यात आले, अशी माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली.
नागरिकांच्या महसुली समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी आमदार विजय शिवतारे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, सहाय्यक निबंधक रवींद्र फुलपगारे, नायब तहसीलदार संदीप पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. शिबिरात ५७ फेरफार प्रकरणे, २१ सातबारा दुरुस्ती प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच जात प्रमाणपत्रे, उत्पन्न दाखले आणि संजय गांधी निराधार योजनेच्या ६९ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. तसेच ई-मोजणी,ॲग्रीस्टॅक, पीएम किसान योजना आणि तक्रार निवारण आदी सेवाही नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
दरम्यान, शिवरी व वाल्हे या दोन मंडळांसाठी एकत्रित शिबिर असल्याने काही नागरिकांना २० किमी प्रवास करावा लागला. या गैरसोयीची दखल घेत प्रशासनाने वाल्हे मंडळासाठी कोळविहिरे येथे पुन्हा स्वतंत्र शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

