आजार टाळण्यासाठी भरडधान्य खा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजार टाळण्यासाठी भरडधान्य खा
आजार टाळण्यासाठी भरडधान्य खा

आजार टाळण्यासाठी भरडधान्य खा

sakal_logo
By

कडूस, ता.२१ : ''गहू आणि तांदळाच्या तुलनेने भरडधान्यात जीवनसत्वे, खनिजे प्रचंड प्रमाणात असतात. भडरधान्य खाल्ल्यावर रक्तात हळूहळू साखर सोडली जाते, उलट गहू, तांदूळ खाल्ल्याने रक्तात साखरेचा पूर आल्यासारखे होते. यामुळे चित्रविचित्र विकार होतात. हे आजार टाळायचे असतील तर भरडधान्य खा,'' असे आवाहन ''आत्मा''चे खेड तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिनेश सावंत यांनी केले.

रानमळा (ता.खेड) येथे भरडधान्य-तृणधान्य व मानवी आरोग्याच्या जनजागृतीसाठी बाजरीपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे कृषी विभागाच्या वतीने महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने मकर संक्रांतीचा भोगीचा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित स्पर्धेमध्ये वैयक्तिक महिलांसह महिला बचत गटांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यात महिलांनी बाजरीपासून थालीपीठ, घावणे, खिचडी, घुगरी, कापण्या, पिठवणी, कोटकं, गोड चिवड्याचे खाद्य प्रकार तयार केले होते.
यावेळी सरपंच प्रमोद शिंदे, ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष यादवराव शिंदे, कृषी अधिकारी अश्विनी नंदकर, कृषी सहायक मोहिनी अकोलकर, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा दौंडकर, उल्हास भुजबळ, अलका शिंदे, वर्षा शिंदे, विजय दौंडकर, नीलेश शिंदे, मच्छिंद्र मोरे, रामदास शिंदे, गणेश भुजबळ व महिला बचत गट उपस्थित होते.


00953