शिक्षक क्रिकेट स्पर्धेत
कुडा बिट संघ विजेता

शिक्षक क्रिकेट स्पर्धेत कुडा बिट संघ विजेता

Published on

कडूस, ता. ८ ः खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा यांच्या वतीने कडूस (ता. खेड) येथे आयोजित तालुकास्तरीय शिक्षक क्रिकेट लीग स्पर्धेत कुडा बिटच्या शिक्षकांचा संघ ‘राजा शिवछत्रपती चषका’चा मानकरी ठरला.

कडूस येथील योगेश धायबर क्रीडा संकुलच्या मैदानावर दोन दिवस स्पर्धा पार पडल्या. यात खेड तालुक्यातील वाडा, डेहणे, कुडा, कडूस, खरपुडी, खेड, पाईट व चाकण या आठ बीटमधील आठ शिक्षक संघांनी सहभाग घेतला. साखळी पद्धतीने खेळविल्या गेलेल्या स्पर्धेत चाकण, खरपुडी, वाडा व कुडा हे चार संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. अंतिम सामना कुडा व चाकण संघांमध्ये अत्यंत चुरशीचा झाला. यात कुडा संघाने विजय खेचून आणीत प्रथम क्रमांकाचा चषक मिळविला.

चाकण संघाने दुसरा, खरपुडी संघाने तिसरा, तर वाडा संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, शालेय पोषण आहार अधिक्षक दत्तात्रेय भारमळ, सिध्देगव्हाणचे सरपंच दौलतराव मोरे, कडुसचे माजी सरपंच निवृत्ती नेहेरे, दत्तानाना ढमाले, संघटनेचे माजी राज्याध्यक्ष दत्तात्रेय सावंत, राज्य सरचिटणीस अनिल पलांडे आदींनी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे, तालुकाध्यक्ष नारायण करपे, दिलीप देशमुख, सुनील धुमाळ, बाबाजी शिंदे, रविकिरण भोसले, तानाजी खैरे, साहीर सिकीलगार, अशोक सावंत, सदानंद माळशिरसकर, तुषार वाटेकर, संदीप म्हसुडगे, जालिंदर दिघे आदींसह अन्य शिक्षकांनी परिश्रम घेतले.
-------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.