कडूसला कुर्बानीच्या निर्णयाचे स्वागत

कडूसला कुर्बानीच्या निर्णयाचे स्वागत

Published on

कडूस, ता. २६ : येथील (ता.खेड) मुस्लिम बांधवांनी रविवारी (ता.२५) आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने या दिवशी जातीय सलोखा तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे हिंदू बांधवांनी स्वागत केले.
हिंदू समाजाच्या आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम समाजाचा बकरी ईदचा सण येत आहे. अवघ्या काही दिवसांवर हा दिवस येऊन ठेपला आहे. कडूस हे धार्मिक दृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. दोन्ही समाजाच्या आनंदाच्या दिवशी काही अप्रिय घटना घडविण्याची संधी समाजकंटकांना मिळू नये, यासाठी दोन्ही समाजाच्या वतीने मशिदीमध्ये शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ईदच्या दिवशी मुस्लिम समाज कुर्बानी देणार नसल्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला. हा निर्णय घेऊन मुस्लिम समाजाने गावात हिंदू-मुस्लिम ऐक्य व एकात्मता अबाधित राखण्यासाठी योगदान दिल्याने ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले. कडूस शहर राष्ट्रवादी काँग्रेसने या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी उद्योजक अभिनाथ शेंडे, सरपंच शहनाज तुरुक, मुनाफ मोमीन, हनिफ मोमीन यांनी पुढाकार घेतला. या बैठकीसाठी उपसरपंच अनिकेत धायबर, ग्रामपंचायत सदस्य विजया नाईक, बारकु गायकवाड, संजय धायबर, अनिल जाधव, गणेश मंडलीक, कैलास कालेकर, सुनील धायबर, मुनाफ मोमीन, हनिफ मोमीन, परवेज मोमीन, दगडू शेख, सरदार मोमीन, शकिल मन्यार, अफजल मोमीन, अन्वर मोमीन, राजू मोमीन, मजहर मोमीन, शहानवाज मोमीन, सलीम पठाण, शब्बीर मोमीन उपस्थित होते.

.................................
01058

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com