सायगावचे नाथा बोंबले पीक स्पर्धेत प्रथम

सायगावचे नाथा बोंबले पीक स्पर्धेत प्रथम
Published on

कडूस, ता. २ : सायगाव (ता.खेड) येथील प्रगतिशील शेतकरी नाथा दगडू बोंबले यांनी रब्बी हंगामी पीक स्पर्धेत खेड तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. हेक्टरी ४२.४७ क्विंटल गव्हाचे विक्रमी उत्पादन मिळवल्याबद्दल त्यांना प्रथम क्रमांकाचे विजेते म्हणून कृषी विभागाच्या वतीने घोषित करण्यात आले. ते रोख पाच हजार रुपयांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत.
प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग करावे, पिकांची उत्पादकता वाढावी, वंचित-दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ व्हावी आणिउत्पादनात भर पडावी यासाठी कृषी विभागामार्फत पीक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. रब्बी हंगाम पीक स्पर्धेत सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांचा स्पर्धेत सहभाग आहे. सन २०२३-२४ या वर्षातील रब्बी हंगामी पिकांसाठी खेड तालुका कृषी विभागाच्या वतीने स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बोंबले यांनी गव्हाचे विक्रमी उत्पादन मिळवले.

बोंबले यांच्या स्पर्धेतील सहभागासाठी व गहू लागवड तंत्रज्ञानाबाबत तालुका कृषी अधिकारी नंदू वाणी, मंडळ कृषी अधिकारी भाऊसाहेब मराडी, कृषी पर्यवेक्षक प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली कृषी सहायक प्राजक्ता वाघ यांनी मार्गदर्शन केले. प्रक्षेत्रावर जाऊन पीक उत्पादनाबाबत सल्ला दिला. कृषिदिनाचे औचित्य साधून माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, तालुका कृषी अधिकारी नंदू वाणी यांच्या हस्ते बोंबले यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

01340

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com