सांडपाणी व्यवस्था असेल तरच घरांच्या नोंदी
कडूस, ता. ३ : एसटीपी प्लांटसह सांडपाणी व्यवस्थापन व विजेसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सोय नसलेल्या प्लॉटिंग क्षेत्रावरील घरांच्या नोंदी न करण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत झाला, अशी माहिती सातकरस्थळ (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या सरपंच रुतिका सातकर व ग्रामसेवक अशोक जगताप यांनी दिली.
राजगुरुनगर शहरालगतच्या सातकरस्थळ ग्रामपंचायत हद्दीत रहदारी वस्त्या वाढत आहेत. लगतच्या तिन्हेवाडी, राक्षेवाडी, होलेवाडी, चांडोली, पाडळी गावच्या परिसरात प्लॉटिंगचा व्यवसाय तेजीत आला आहे. सांडपाणी व्यवस्थापन व विजेच्या ट्रान्स्फॉर्मरची सोय न करता प्लॉटिंग होत असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांवर ताण येत आहे. ग्रामपंचायतीची कचरा, सांडपाणी व्यवस्थापनासह पाणी पुरवठा व्यवस्था कोलमडत आहे. या सर्व बाबींवर सातकरस्थळ ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत गुरुवारी (ता. ३) सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली व सर्वानुमते सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन व विजेसाठी स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मरची सोय नसलेल्या प्लॉटिंगवर बांधलेल्या घरांच्या नोंदी ग्रामपंचायत दप्तरी बंद करण्याचा ठराव मंजूर केला. यावेळी सरपंच सातकर, उपसरपंच स्वाती सातकर, माजी सरपंच अजय चव्हाण, माजी उपसरपंच मयूर जगदाळे, नीलेश आरबुज, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सुपे, जयश्री पडवळ, नयना काळे, अमिता सातकर, वर्षा देवरे व ग्रामपंचायत अधिकारी अशोक जगताप उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.