कडूस येथील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

कडूस येथील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

Published on

कडूस, ता. १६ : कडूस (ता. खेड) येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त रामभाऊ म्हाळगी विद्यालय, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर विविध कार्यक्रम पार पडले.
यावेळी दहावी व बारावीतून पहिल्या तीन क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांकडून वैयक्तिक शिष्यवृत्तीची रक्कम वितरित केली.
यादवराव विठ्ठलराव शिंदे यांच्या वतीने पाच हजार, चिंतुकाका गोडसे यांच्या वतीने पाच हजार, ज. मा. रवळकर यांच्या स्मरणार्थ १५ हजार, को. ना. ठोंबरे यांच्या स्मरणार्थ दहा हजार, पु. मा. देशमुख यांच्या वतीने चार हजार २००, लचके कुटुंबीयांकडून तीन हजार, विजयाताई वाकणीस यांच्या वतीने पाच हजार, सुषमा जोग यांच्या वतीने एक हजार, क्षीरसागर गुरुजी यांच्या वतीने एक हजार, श्रीराम शंकर दाणी यांच्या वतीने पाच हजार, तर विद्यालयाचे कार्यरत शिक्षक रामदास रेटवडे, प्रवीण काळे व दत्तात्रेय येवले यांच्या वतीने ११ हजार रुपये शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते.
सरपंच हेमलता खळदकर, उपसरपंच रंजना पानमंद, सोसायटीचे अध्यक्ष शंकरराव कावडे, उपाध्यक्ष अशोक बंदावणे, संचालिका भावना शेंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापूसाहेब शेळके व ग्रामस्थांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती स्वाधीन केली. यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे संस्थापक अभिनाथ शेंडे, प्रकाश कालेकर, ग्रामपंचायत सदस्य अरुण शिंदे, गणेश मंडलिक, ॲड. सुरेखा कड, योगेश ढमाले, श्यामराव ढमाले, बारकू गायकवाड, मुख्याध्यापक अनिल पोटे, हर्षदा ढमाले, कल्पना शेजवळ, सुनील धायबर, शांताराम अभंग, युवराज बंदावणे, रोहित बलुरे आदी उपस्थित होते. चांगदेव ढमाले व अनिकेत धायबर यांनी सूत्रसंचालन केले.

दिवंगत अशोकभाऊ शेंडे यांच्या स्मरणार्थ प्रत्येकी पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य अभिनाथ शेंडे व सोसायटीच्या संचालिका भावना शेंडे यांनी जाहीर केले.
०१८८६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com