कडूसमधील पाणीपुरवठा योजनेच्या पाइपांना आग

कडूसमधील पाणीपुरवठा योजनेच्या पाइपांना आग
Published on

कडूस, ता. ६ ः कडूस (ता. खेड) येथे उघड्यावर अंथरलेल्या जलजीवन मिशनच्या नळ पाणीपुरवठा योजनेतील पाइपांना गुरुवारी (ता.५) दुपारी आग लगाल्याची घटना घडली. स्थानिक तरुणांनी आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळले.
गेल्या दोन वर्षांपासून कडूस येथे जलजीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हे काम खूप संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी उघड्यावर पाइप अंथरले आहेत. आराखड्यानुसार जमिनीखाली खोल गाडले नाहीत. नेहेरेशिवार व टोकेवाडीच्या डोंगरावर पाणी साठवण टाकी बांधली आहेत. या जलवाहिनीसाठी डोंगर फोडला आहे. मात्र, जलवाहिनीसाठी खोदलेली घळी जशीच्या तशी आहे. ती पुन्हा बुजविण्यात आली नाही. अनेक ठिकाणी साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आहे. या नळ योजनेच्या कामातील ढिसाळपणा गुरुवारी उघड झाला. दुपारी साबुर्डी रस्त्यावरील पिराच्या मंदिराजवळ उघड्यावर अंथरलेले पाइप आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. हाय-डेन्सिटी पॉलिथिलीन पाइप असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. रस्त्याच्या कडेचे गवत कोणी तरी पेटवले व ही आग उघड्यावरील पाइपांना लागली. संपूर्ण पाइपलाइन जळत चालली होती. धुराचे मोठे लोट आकाशात वर गेल्याने आगीची घटना समजली. जमलेल्या स्थानिक तरुणांनी ठेकेदाराला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सुमारे २० मीटरचा पाइप जळून गेला. अखेर रस्त्यावरून जाणारे स्थानिक तरुण बाळासाहेब बोंबले, अमोल ढमाले, प्रकाश जगताप, उपसरपंच अरुण मुळूक, अक्षय खळदकर, विशाल ढमाले यांनी माती व पाण्याने आग आटोक्यात आणली. तरुणांमुळे मोठी हानी टळली. ठेकेदार व अधिकाऱ्यांनी कामाकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

02170

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com