दोंदे येथे मल्लखांबाची प्रात्यक्षिके

दोंदे येथे मल्लखांबाची प्रात्यक्षिके

Published on

कडूस, ता. २१ ः दोंदे (ता. खेड) येथे शिवजयंतीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील तरुणांनी किल्ले शिवनेरी येथून आणलेल्या शिवज्योतीचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे जल्लोषात स्वागत केले. शिवरायांच्या पुतळ्याची व शिवज्योतीची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मल्लखांब प्रात्यक्षिके मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
शिवज्योतीचे गुरुवारी (ता. १९) सकाळी आठ वाजता ग्रामस्थांनी गावच्या वेशीवर जल्लोषात स्वागत केले. सरपंच प्रतीक्षा दरवडे, माजी उपसरपंच सिद्धार्थी कोहिनकर, सामाजिक कार्यकर्ते शरद सुकाळे, सुहास उढाणे यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवज्योतीचे पूजन झाले. ग्रामस्थांनी शिवपुतळ्याचे पूजन करून विद्युत रोषणाई व फुलांनी सजवलेल्या वाहनातून मार्गस्थ झालेल्या मिरवणुकीत महिला व मुलांचा सहभाग उल्लेखनीय होता. या मिरवणुकीत चिंचवड येथील सह्याद्री क्रीडा मंचाच्या मुलांनी सादर केलेली मल्लखांबाची प्रात्यक्षिके मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरली. शिवरायांच्या महाआरतीने मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

     
02220

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com