सातकरस्थळच्या उपसरपंचपदी नयना काळे

सातकरस्थळच्या उपसरपंचपदी नयना काळे

Published on

कडूस, ता. १५ : खेड तालुक्यातील सातकरस्थळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नयना प्रवीण काळे यांची बिनविरोध निवड झाली.
अमिता सातकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. लोकनियुक्त सरपंच रुतिका सातकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १०) ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. या पदासाठी काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. ग्रामसेवक अशोक जगताप यांनी निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहिले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य अजय चव्हाण, नीलेश आरबुज, मयूर जगदाळे, स्वाती सातकर, प्रमोद सुपे, जयश्री पडवळ, वर्षा देवरे, माजी सरपंच मारुती सातकर, अशोक सातकर, वाफगावचे सरपंच नंदकुमार सुर्वे, माजी उपसरपंच कालिदास सातकर, देविदास सातकर, उद्योजक गणेश काळे, अजित सातकर, किरण काळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

2252

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com