पळसदेवच्या सत्तेत लबाडांची टोळी

पळसदेवच्या सत्तेत लबाडांची टोळी

पळसदेव, ता. ३१ : ‘‘पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या सत्तेत लबाडांची टोळी सहभागी झाली असून, स्वार्थासाठी कोलांटउड्या घेणाऱ्यांकडून गावाच्या हिताच्या गोष्टी केल्या जात आहेत,’’ अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे येथील युवा नेते विशाल बनसुडे यांनी केली.
ते म्हणाले, ‘‘गेल्या पंचवार्षिक कार्यकारी मंडळात ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडीत ज्यांचा पराभव झाला, त्यांना पराभव पचवणे शक्य झाले नाही. त्यांच्याकडून पराभव पचविण्याच्या गोष्टी केल्या जातात. ग्रामदैवताच्या मंदिरातील आणा-भाका विसरुन सध्याच्या कार्यकारी मंडळातील राष्ट्रवादीला खिंडार पाडत गट निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून, सामान्य मतदारांच्या भावना दुखावल्या आहेत. परंतु, या प्रकारामुळे लबाडांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. जेथे कारखान्याची ऊस बिल शेतकऱ्यांना वेळेवर देणे शक्य होत नाही, अशा कारखान्याचे येथील संचालक विकासकामांना खोडा घालत आहेत. आरोप करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सत्तेच्या अमलाखाली यांना ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच यांच्या खुर्चीचा मान राखता येत नाही. ’’

पळसदेव गावासाठी विविध विकास कामांसाठी आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून आतापर्यंत शंभर कोटींहून अधिकचा निधी आला आहे. यातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. परंतु, जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आतापर्यंत एकाही विकासकामासाठी निधी दिला नाही. त्यामुळे निधी न दिलेल्या नेत्याच्या समर्थकांनी गावाच्या विकास कामांवर बोलणे नैतिकतेला धरुन नाही.
- विशाल बनसुडे, युवा नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस, पळसदेव (ता. इंदापूर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com