डाळज क्र. ३  येथील 
अपघातात चौघे ठार, दोन जखमी

डाळज क्र. ३ येथील अपघातात चौघे ठार, दोन जखमी

Published on

पळसदेव, भिगवण, ता. २ ः पुणे-सोलापूर महामार्गावर मोटारीचा टायर फुटून चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. यात मोटारीतील चौघे जण जागीच ठार झाले. तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. डाळज क्र. ३ (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत हा अपघात झाला. सर्व अपघातग्रस्त तेलंगण राज्यातील आहेत.

मंगळवारी (ता. २) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास डाळज क्र. ३ गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या मोटारीचा पुढील टायर फुटल्याने मोटार रस्त्यालगत पलटी झाली. दरम्यान रस्त्यालगतच्या सिमेंटच्या ड्रेनेच्या बांधकामास धडकली. धडकेत मोटारीच्या पुढील भाग चक्काचूर झाला. यावेळी मोटारीतून प्रवास करणारे इरफान पटेल (वय २४), मेहबूब कुरेशी (वय २४), फिरोज कुरेशी (वय २६), फिरोज कुरेशी (वय २८) हे सर्वजण जागीच मृत्युमुखी पडले. तर रफिक कुरेशी (वय ३४) हे गंभीर जखमी तर सय्यद इस्माईल अमीर (वय २३, सर्वजण राह. नारायणखेड, जि. मेंढक, तेलंगण) हे किरकोळ जखमी झाले. जखमींना भिगवणच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक महेश कुरेवाड, भागवत शिंदे, दत्तात्रेय मदने, भानुदास जगदाळे, नितीन जगताप, भिगवण पोलिस व एनएचआयच्या सुरक्षा जवानांनी मोटारीतून जखमींना बाहेर काढत वाहतूक सुरळीत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.