ड्रोनद्वारे औषध फवारणीचे कळसला प्रात्यक्षिक

ड्रोनद्वारे औषध फवारणीचे कळसला प्रात्यक्षिक
Published on

कळस, ता. ५ : कळस (ता. इंदापूर) येथे कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोनव्दारे पिकांवर औषध फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. येथील संतोष धायतोंडे यांच्या ऊस पिकावर ड्रोनव्दारे औषध फवारणी करून, शेतकऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली.

कमी वेळेत जास्तीच्या क्षेत्रावर औषध फवारणी करता येत असल्याने, याचा शेतकऱ्यांमध्ये वापर वाढावा या दृष्टिकोनातून प्रात्यक्षिकाव्दारे माहिती देण्याचे काम तालुक्यात केले जाणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले की, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पीक स्पर्धेत सहभागी होणे गरजेचे आहे. यातून तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बक्षिसास पात्र ठरण्याच्या दृष्टीने पिकांचे उत्पन्न घेतले पाहिजे. यासाठी कृषी विभागाने माऊली ग्रीन आर्मीच्या मदतीने प्रात्यक्षिक दाखविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
दरम्यान, भविष्यात ड्रोनची मागणी वाढणार असल्याने यासाठी इंदापूर तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये १५ दिवसांच्या प्रशिक्षणाची सोय केली आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस प्रमाणपत्र दिले जाणार असून, ड्रोन खरेदीसाठी बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्जासाठी ते आवश्यक ठरत आहे.

यावेळी मंडल कृषी अधिकारी के. जी. पिसाळ, कृषी पर्यवेक्षक एस. एन. सरडे, कृषी सेवक एन. एन. टिळेकर, कृषी सहाय्यक एस. डी. झगडे, पी. बी. मोहोळकर, पी. बी. काळे, एस. जे. धुरगुडे, एस. जी. साळवे, एस. जी. मोरे, एस. बी. खरात, सुनील ओमासे, विजय गावडे, दत्तात्रेय खारतोडे, संजय राऊत, श्याम धायतोंडे, दिलीप खटके, माउली संस्थेचे बाळासाहेब सानप, महादेव शिरसट यांसह गरोडे ड्रोन कंपनीचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

02703

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com