

पळसदेव, ता. १३ : इंदापूर तालुक्यातील पशुधनाची गणना करण्यासाठी ३४ प्रगणक व ५ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या एकविसाव्या पशुगणना कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील जनावरांची अचूक माहिती संकलित करण्यासाठी प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी आपल्याकडील पाळीव जनावरांची खरी माहिती प्रगणकांना द्यावी, असे आवाहन गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी केले. ते म्हणाले, ‘‘नागरी व ग्रामीण भागातील १६ प्रजातींच्या जनावरांची गणना करण्याचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये गाई वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, डुक्कर, घोडा, खेचर, गाढव, कुत्रा, ससा, हत्ती व कुकुट पक्षांचा समावेश असणार आहे. या जनावरांचे जातीनिहाय गणना केली जाणार आहे. यामध्ये लिंगनिहाय व वयोगटानुसार आकडेवारी जमा केली जाणार आहे. पाळीव जनावरांबरोबर भटकी जनावरे, कुत्री यांचीही गणना केली जाणार आहे. शासनाने पशुधनाला बिल्ला मारणे बंधनकारक केले आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.