खडीक्रशर परवाना रद्द करण्यासाठी खारतोडे यांचे उपोषण

खडीक्रशर परवाना रद्द करण्यासाठी खारतोडे यांचे उपोषण

Published on

कळस, ता. १३ : अवैध गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी सुमारे पाऊणे नऊ कोटींचा दंड ठोठावलेल्या बिरंगुडवाडी (ता. इंदापूर) येथील गट क्र. २५६ मधील खडीक्रशरला पुन्हा उत्खननाचा परवाना देण्यात आला आहे.
दंडाचा आदेश काढणाऱ्या तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली झाल्यानंतर नव्याने रुजू झालेले तहसीलदार जीवन बनसोडे यांनी या क्रशरला परवानगी दिली आहे. एकीकडे या खडीक्रशरमुळे लगतच्या शेतकऱ्यांचे जीवन उद्‍ध्वस्त झालेले असताना, दुसरीकडे अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाक करून मंजुरी देण्यामागे नेमके काय कारण आहे? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांनी केला आहे. दंडाची रक्कम वसूल करून हा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी प्रातांधिकारी कार्यालयासमोर अन्नपाणी त्याग करून उपोषणास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com