पळसदेव येथे काळे यांनी घेतले उसाचे एकरी ११० टन उत्पादन
पळसदेव, ता. १८ : पळसदेव (ता.इंदापूर) येथील प्रगतशील शेतकरी भूषण काळे यांनी उसाचे एकरी ११० टन उत्पादन घेण्याचा विक्रम केला आहे. एकीकडे उजनीच्या पाण्यामुळे ऊस उत्पादन घटल्याची ओरड शेतकरी करत असताना दुसरीकडे काळे यांनी एकरी शंभर टनांचा टप्पा ओलांडत इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे.
कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे संचालक असलेले भूषण काळे प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात त्यांनी गतवर्षी ८६०३२ वाणाच्या उसाची ५ एकर क्षेत्रावर पूर्व हंगामी लागवड केली होती. सेंद्रिय खतांचा वापर, पिकाची निगराणी व रासायनिक खते औषधांची योग्य वेळी मात्रा दिल्याने उसाची वाढ सुमारे ६० काड्यांपर्यंत झाली आहे. यातून पाच एकर क्षेत्रात सुमारे साडेपाचशे टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे.
उजनीच्या पाण्यावर वारंवार एकच पीक घेऊन जमिनीचा पोत खराब करण्याचे काम शेतकरी करत आहेत. वास्तविक पिकाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी खते-औषधांची मात्रा देणे गरजेचे आहे. जमिनीची मशागत व पिकाची देखभाल शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देते. आम्ही लागवडीपासून ते ऊस तोडणी येईपर्यंत एकरी साठ हजार रुपयांचा खर्च करून जोपासलेल्या उसाचे एकरी तीन लाखांपर्यंत उत्पादन मिळणार आहे.
-भूषण काळे, ऊस उत्पादक
02877
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

